
India vs Australia Test: भारतीय क्रिकेट संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातील बॉर्डर-गावसकर ट्रॉफी या ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिले तीन सामने खेळून झाले आहेत. मालिकेत सध्या १-१ अशी बरोबरी आहे. अशात आता चौथा सामना महत्त्वाचा आहे.
चौथा सामना बॉक्सिंग डेला म्हणजेच २६ डिसेंबर रोजी सुरू होईल. परंपरेप्रमाणे बॉक्सिंग डे कसोटी मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर खेळवला जाणार आहे. त्यामुळे दोन्ही संघ सध्या मेलबर्नमध्ये असून सराव करत आहेत.