
IND vs AUS Test Series : ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात ट्रॅव्हिस हेडने शतकी खेळी केली. सुरूवातीला संथ खेळणाऱ्या हेडने नंतर खेळीचा वेग वाढवला आणि चौफेर फटकेबाजी सुरू केली. इतर फलंदाज बाद होत होते, पण हेडमात्र मैदानावर टीकून होता. तो भारतीय संघासाठी डोकेदुखी बनला होता. रोहित शर्माने त्याला बाद करण्यासाठी सर्व गोलंदाज वापरून पाहिले, पण हेड काही मागे हटत नव्हता. १०६ चेंडूत त्याने आपले शतक पुर्ण केले आणि मग फटकेबाजीचा वेग दुप्पट केला. हेड चांगल्या लयमध्ये असताना सिराजने त्याला बोल्ड केले आणि दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची पाहायला मिळाली.
बोल्ड झाल्यानंतर हेडच्या प्रतिक्रियेवर सिराजने त्याला रागात सेंडऑफ दिला. त्यावर हेडने त्याला प्रत्युत्तर केल्याचे दिसले. त्यांच्यातील हा गरमागरमीचा व्हिडिओही व्हायरल झाला. सिराजला नंतर त्याच्या सेंडऑफमुळे पंचांनी वॉर्निंगही दिल्याचे पाहायला मिळाले.