
Border Gavaskar Trophy 2024-25: भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma) याचा फॉर्म त्याला साथ देत नाहीए. न्यूझीलंडविरुद्धच्या घरच्या मैदानावरील निराशाजनक कामगिरीनंतर ऑस्ट्रेलियात त्याला सूर गवसेल असे वाटले होते, परंतु तो ३ व ६ धावाच करू शकला. ३७ वर्षीय रोहित तिसऱ्या कसोटीसाठी नेट्समध्ये प्रचंड मेहनत घेतोय, पण त्याला कितपत यश मिळेल, हे ब्रिस्बेन कसोटीतच कळेल. जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखाली भारताने BGT मालिकेची सुरूवात विजयाने केली, परंतु रोहितकडे दुसऱ्या कसोटीचे नेतृत्व गेले आणि भारताला हार पत्करावी लागली. त्यामुळेही त्याच्यावर टीका होतेय.