
Travis Head vs Mohammed Siraj : अॅडिलेड कसोटीत बाजी मारून ऑस्ट्रेलियाने सामन्यात बाजी मारली. सामना तिसऱ्या दिवशी सकाळच्या सत्रात संपुष्टात आला. पण कालचा ( दुसरा ) दिवस एका राड्यामुळे चर्चेत राहिला. सोशल मीडियावर मिम्सचे वादळ उठले आणि हेड-सिराज चर्चेच्या केंद्रास्थानी आले. ऑस्ट्रेलियाच्या डावादरम्यान सिराजला ऑस्ट्रेलियन चाहत्यांकडून डिवचले जात होते अन् सिराजने शतकवीराची दांडी उडवत ऑस्ट्रेलियन्सना उत्तर दिले. सिराजने मनात साठवलेला रोष विकेट सेलिब्रिशन मधून बाहेर आला आणि दोघांमध्ये शाब्दिक चकमक पाहायला मिळाली. पण काल पेटलेल्या या वादाच्या ठिणगीचे आज थेट गळाभेटीत रूपांतर झाले. पण हा नेमका विषय काय? कोणी सिराजला ट्रोल करतयं तर कोणी सपोर्ट...