

Why did Virat Kohli leave Team India suddenly? भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या कसोटी मालिकेचा निकाल भारतीयांना अपेक्षित होता, तसा लागला नाही. जसप्रीत बुमराहच्या नेतृ्त्वाखाली टीम इंडियाने पहिली कसोटी खेळली अन् पर्थवर ऑस्ट्रेलियाला २९५ धावांनी हरवून मालिकेत आघाडी घेतली. त्यानंतर रोहित शर्मा आला, परंतु त्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला सातत्य राखता आले नाही. पुढील चारपैकी ३ सामने ऑस्ट्रेलियाने जिंकले आणि मालिका ३-१ अशी नावावर केली. १० वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाने बॉर्डर गावस्कर ट्रॉफी जिंकली. पण, या दरम्यान भारतीय संघाच्या ड्रेसिंग रूममधील बातम्या लिक झाल्या अन् पुन्हा वाद चव्हाट्यावर आला.