
भारताचा स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजा गुरुवारी झालेल्या भारत विरुद्ध इंग्लंड संघात झालेल्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात चमकला आहे. नागपूरला झालेल्या या वनडे सामन्यात जडेजाने मोठ्या विक्रमांना गवसणी घातली आहे.
या सामन्यात इंग्लंडचा संघ ४७.४ षटकाच २४८ धावांवर सर्वबाद झाला. या सामन्यात रवींद्र जडेजाने ९ षटके गोलंदाजी करताना २६ धावा खर्च करताना ३ विकेट्स घेतल्या.