Why is Abhimanyu Easwaran not in India playing XI? भारत-इंग्लंड यांच्यातल्या पहिल्या कसोटीत अंतिम ११ मध्ये कोणाला संधी मिळेल, याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. शुभमन गिल व रिषभ पंत या कर्णधार व उपकर्णधारांची प्लेइंग इलेव्हनमधील जागा निश्चित झालीच आहे. पण, उर्वरित ९ खेळाडू कोण असतील हे आज संध्याकाळपर्यंत किंवा थेट उद्या नाणेफेकीनंतर स्पष्ट होईल. त्यामुळेच प्लेइंग इलेव्हनमध्ये कोण असायला हवी, असे सल्ले मिळू लागले आहेत. अशाच कामगिरीला महत्त्व द्या असेही सल्ले आहेत आणि त्यावरूच भारताचा माजी क्रिकेटपटू संतापला आहे.