Abhimanyu Easwaran was once again overlooked: Fans question
अभिमन्य इश्वरनला पुन्हा एकदा कसोटी संघात पदार्पणासाठी वाट पाहावी लागणार आहे. भारत अ संघाचे नेतृत्व करणाऱ्या अभिमन्यूने यापूर्वीही अनेकदा कसोटी संघाचे दार ठोठावले होते, परंतु त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली नाही. या इंग्लंड दौऱ्यावर त्याचे पदार्पण होईल, अशी शक्यता होती. पण, कर्णधार शुभमन गिलने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत साई सुदर्शनला पदार्पणाची संधी दिली. त्यात करुण नायर ८ वर्षांनी कसोटी संघात परतला.