IND vs ENG: Pataudi Trophy Renamed as Anderson-Tendulkar Trophy
भारत आणि इंग्लंड यांच्यात उद्यापासून पाच कसोटी सामन्यांची मालिका सुरू होतेय. पहिला कसोटी सामना लीड्सवर खेळला जाणार आहे आणि या सामन्यापूर्वी ऐतिहासिक घोषणा करण्यात आली आहे. इंग्लंड आणि भारत कसोटी संघ आता पतौडी नव्हे, तर अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीसाठी खेळतील. सर जेम्स अँडरसन आणि सचिन तेंडुलकर यांच्या कसोटी क्रिकेटमधील उल्लेखनीय कामगिरीला समर्पित ही नवीन ट्रॉफी असणार आहे.