England doesn’t fear Indian bowling- Ben Stokes bold claim
इंग्लंड संघाचा कर्णधार बेन स्टोक्स याने टीम इंडियावर थेट वार केला आहे. जसप्रीत बुमराहला आम्ही घाबरत नाही, असे विधान त्याने आज केले. भारत-इंग्लंड यांच्यात उद्यापासून पहिली कसोटी सुरू होतेय आणि या दौऱ्यासाठी टीम इंडियाचा युवा संघ मैदानावर उतरणार आहे. त्यात जसप्रीत बुमराह, लोकेश राहुल, रवींद्र जडेजा हे अनुभवी खेळाडू आहेत. त्यामुळेच इंग्लंडने जस्सीला टार्गेट केले आहे. जसप्रीत बुमराह अव्वल दर्जाचा गोलंदाज असला तरी त्याच्यात एकट्याने सामना जिंकून देण्याची धमक नाही, असेही स्टोक्स म्हणाला.