India vs England 1st Test, Leeds Day 3 : भारतीय संघाचा जलदगती गोलंदाज मोहम्मद सिराज याची पहिल्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी इंग्लंडचा फलंदाज हॅरी ब्रूक याच्याशी बाचाबाची झाली. शतकाच्या उंबरठ्यावर असलेल्या ब्रूकची एकाग्रता भंग करण्यासाठी सिराज शाब्दिक वाद घातलाना दिसला. सामन्याच्या ८४ व्या षटकात हा प्रकार घडला. हॅरी ब्रूकने या षटकात सलग दोन चौकार खेचले आणि त्यानंतर सिराज संतापला. त्यानंतर सिराजने अप्रतिम चेंडू टाकून ब्रूकला अचंबित केले.