Gautam Gambhir addresses the media after India’s shock defeat
भारतीय संघाला पहिल्या कसोटीत इंग्लंडकडून लाजीरवाणा पराभव पत्करावा लागला. भारताला चौथ्या डावात ३७१ धावांचा बचाव करता आलेला नाही आणि इंग्लंडने ५ विकेट्स राखून मॅच जिंकली. पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडने १-० अशी आघाडी घेतली आहे. या सामन्यानंतर पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आला आणि त्याच्या उत्तरांनी सर्वांना अचंबित केले. फलंदाजांनी पाच शतकं झळकावूनही भारताला पराभव पत्करावा लागल्याने सर्वांना आश्चर्य वाटले आहे.