Team India viral throwing video from Leeds practice : गौतम गंभीरच्या परत येण्याने टीम इंडियाचा उत्साह वाढला आहे. आता सराव सामने झाले.. आता खऱ्या युद्धाची अंतिम तयारी सुरू झाली आहे. भारतीय खेळाडू लीड्समध्ये कसून सराव करत आहेत आणि गौतमचे प्रत्येकाकडे बारीक लक्ष आहे. शुभमन गिल, रिषभ पंत, लोकेश राहुल, यशस्वी जैस्वाल यांनी फलंदाजीचा चांगलाच सराव केला. त्याचवेळी जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज यांनीही गोलंदाजीचा मारा केला. पण, याच सराव सत्रात असा प्रसंग घडला, की कुलदीप यादवसह भारताचे ३-४ खेळाडू कुणाच्यातरी अंगावर धावून गेले. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.