IND vs ENG 1st Test : रिषभ पंत ड्रेसिंग रूममध्ये येताच KL Rahul ने का जोडले हात? Viral Video मधून मिळतील सर्व उत्तरं

KL Rahul Joins Hands as Pant Walks In – Here’s Why : इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत शानदार अर्धशतक झळकावल्यानंतर रिषभ पंत जेव्हा ड्रेसिंग रूममध्ये परतला, तेव्हा केएल राहुलने उभं राहून दोन्ही हातांनी त्याला नमस्कार केला! हा क्षण कॅमेऱ्यात कैद झाला आणि काही क्षणातच सोशल मीडियावर व्हायरल झाला.
KL Rahul joins hands to Rishabh Pant
KL Rahul joins hands to Rishabh Pantesakal
Updated on

KL Rahul joins hands to Rishabh Pant in dressing room viral video

भारतीय फलंदाजांनी हेडिंग्ले कसोटीचा पहिल्या दिवशी वर्चस्व गाजवले. यजमान इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा घेतलेला निर्णय त्यांच्याच अंगलट आला. यशस्वी जैस्वाल, कर्णधार शुभमन गिल यांची शतकं आणि रिषभ पंत व केएल राहुल यांच्या उपयुक्त खेळीच्या जोरावर भारताने पहिल्या दिवशी ३ बाद ३५१ धावा उभ्या केल्या. दिवसाचा खेळ संपल्यानंतर जेव्हा रिषभ पंत ड्रेसिंग रूममध्ये आला, तेव्हा लोकेश राहुलने त्याच्यासमोर हात जोडले. BCCI ने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com