Indian cricket team travels by train to Leeds for 1st Test
भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेच्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील संघ आज लीड्सला ट्रेनने पोहोचला. शुभमन गिलसह अनेक खेळाडूंनी ट्रेनने प्रवास करत लीड्स गाठलं, परंतु स्टेशनवर मोजून ५-६ चाहते आणि मीडियाचे प्रतिनिधी स्वागतासाठी दिसले, ही बाब क्रिकेटप्रेमींना खटकणारी ठरली आहे. भारतीय संघाचे जगभरात चाहते आहेत, परंतु लीड्स स्टेशनवर हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच फॅन असल्याचे आश्चर्य वाटले. भारतीय संघ स्टेशनच्या जवळील हॉटेलमध्ये थांबला आहे.