Team India Coaching Update: भारत-इंग्लंड कसोटी मालिकेला २० जूनपासून सुरुवात होत आहे. रोहित शर्मा, विराट कोहली व आर अश्विन या तीन सीनियर खेळाडूंच्या अनुपस्थितीत टीम इंडियाचा हा पहिलाच कसोटी दौरा आहे. या तिघांनी निवृत्ती जाहीर केली आहे आणि कसोटी संघाची धुरा शुभमन गिलच्या खांद्यावर सोपवली गेली आहे. त्यामुळे त्याच्या कामगिरीवर सर्वांचे लक्ष आहे. भारत अ विरुद्धच्या सराव सामन्यात गिलने अर्धशतक झळकावून आश्वासक चित्र दाखवले आहे, परंतु इंग्लंडविरुद्ध त्याची खरी कसोटी असणार आहे. अशात भारताचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर ( Gautam Gambhir) कौटुंबिक कारणास्तव मायदेशात परतला आणि तो कधी परतणार हे अद्याप स्पष्ट नाही.