IND vs ENG 1st Test 2025 Rishabh Pant batting highlights : इंग्लंडविरुद्धच्या हेडिंग्ले कसोटीचा पहिला दिवस भारताने गाजवला. शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील पहिल्याच कसोटीत टीम इंडियाने 'यशस्वी' 'शुभ'आरंभ केला. यशस्वी जैस्वाल आणि लोकेश राहुल यांनी ९१ धावांची भागीदारी करताना इंग्लंडमधील २०१२नंतरची सर्वोत्तम सलामीच्या धावसंख्येची नोंद केली. त्यानंतर यशस्वी व शुभमन यांच्या शतकांनी मॅच गाजवली, त्यात रिषभ पंतनेही अर्धशतक झळकावताना पाच मोठे विक्रम नोंदवले.