Sachin Tendulkar Makes Bold Prediction for IND vs ENG Test Series
अखेर तो दिवस उजाडला... रोहित शर्मा, विराट कोहली यांच्या कसोटीतून निवृत्तीनंतर टीम इंडियात बऱ्याच हालचाली झाल्या. २५ वर्षीय शुभमन गिल हा भारतीय कसोटी संघाचा नवीन कर्णधार म्हणून समोर आला. त्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया आजपासून पहिल्या कसोटीसाठी मैदानावर उतरणार आहे. इंग्लंडविरुद्धची ही कसोटी मालिका गिल अँड कंपनीसाठी सोपी नक्कीच नसेल, परंतु कर्णधाराने जिंकण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. त्यात महान फलंदाज सचिन तेंडुलकर यानेही या मालिकेच्या निकालावरून मोठी भविष्यवाणी केली आहे.