How Sai Sudharsan got inspired by Virat Kohli’s training : शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ आज पहिला कसोटी सामना खेळण्यासाठी मैदानावर उतरला आहे. इंग्लंडविरुद्ध कसोटी सामन्यातून आज साई सुदर्शननने पदार्पण केले. भारताच्या कसोटी संघात २० जून या तारखेला पदार्पण करणारा तो सहावा खेळाडू ठरला. १९९६ मध्ये राहुल द्रविड व सौरव गांगुली ( वि. इंग्लंड) यांनी, तर २०११ मध्ये विराट कोहली, प्रविण कुमार व अभिनव मुकूंद ( वि. वेस्ट इंडिज) यांनी कसोटी संघात २० जून रोजीच पदार्पण केले. विराटच्या ट्रेनिंग व्हिडिओने साई सुदर्शनला प्रेरित केले आणि आज तो कसोटी संघातून पदार्पण करतोय.