England Get Unexpected Support IND vs ENG 1st Test Day 2 : भारत-इंग्लंड यांच्यातला लीड्स कसोटी सामन्याचा पहिला दिवस शुभमन गिल अँड टीमच्या नावावर राहिला. यशस्वी जैस्वाल व लोकेश राहुल या जोडीने आश्वासक सुरुवात करून दिली. पदार्पणात साई सुदर्शनला अपयश आले असले तरी यशस्वी व कर्णधार गिल यांच्या शतकांनी इंग्लंडची डोकेदुखी वाढवली. यशस्वी १०१ धावांवर माघारी परतल्यानंतर गिल व रिषभ पंत ही जोडी मैदानावर दिवस संपेपर्यंत उभी राहिली. भारताने पहिल्या दिवशी ३ बाद ३५९ धावा केल्या. गिल १२७ धावांवर, तर रिषभ ६५ धावांवर खेळतोय. आता सर्वांचे लक्ष रिषभच्या शतकाकडे लागले असताना इंग्लंडच्या मदतीला 'तो' येण्याचे संकेत मिळाले आहेत.