Gautam Gambhir decision on Rishabh Pant and Yashasvi Jaiswal : गौतम गंभीर-शुभमन गिल यांच्या युगाला सुरूवात झाली आहे. रोहित शर्मा, विराट कोहली व आर अश्विन या सीनियर खेळाडूंनी कसोटीतून निवृत्ती घेतल्यानंतर टीम इंडिया नवीन सुरुवात करणार आहे. शुभमन गिल ( Shubman Gill) भारताच्या कसोटी संघाचा नवीन कर्णधार म्हणून सुरुवात करणार आहे आणि इंग्लंड दौऱ्यावर भारतीय खेळाडूंचा कस लागणार आहे. पण, गौतम गंभीरसारखा मुख्य प्रशिक्षक असताना नियोजन चांगलेच होईल, यात शंका नाही. त्यामुळेच गौतम गंभीर पहिल्या कसोटीत प्लेइंग इलेव्हनमध्ये काही प्रयोग करण्याची शक्यता आहे.