
HARDIK PANDYA VIRAL VIDEO: रोहित शर्माच्या शतकाच्या जोरावर भारतीय संघाने कटक येथील दुसरी वन डे मॅच सहज जिंकली आणि इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. भारतीय संघाने इंग्लंडविरुद्ध सलग सातवी वन डे मालिका जिंकली आहे आणि या सामन्यात रोहितने अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे. रोहितचा फॉर्म परतणे ही भारतासाठी सर्वात मोठी सकारात्मक बातमी मानली जातेय. दरम्यान, या सामन्यानंतर सोशल मीडियावर हार्दिक पांड्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यामध्ये विराट कोहली व रवींद्र जडेजा हार्दिकच्या बॅटकडे पाहून जोरजोरात हसताना दिसत आहेत.