

IND vs ENG 2nd ODI
esakal
IND vs ENG 2nd ODI: भारत आणि इंग्लंड यांच्यात ३ एकदिवसीय सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील दुसरा सामना आज (१६ जुलै) कार्डिफ येथे खेळला जाणार आहे. इंग्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेतील पराभव मागे टाकत भारतीय संघाने वनडे मालिकेची दमदार सुरुवात केली. पहिल्या वनडेत इंग्लंडचा पराभव करत शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.
आता आज (१६ जुलै) कार्डिफच्या सोफिया गार्डन्स मैदानावर होणाऱ्या दुसऱ्या वनडेत भारतासमोर मालिका खिशात घालण्याची मोठी संधी असणार आहे. दुसरीकडे, घरच्या मैदानावर मालिका जिवंत ठेवण्यासाठी इंग्लंड विजयासाठी सर्वस्व पणाला लावणार आहे.