
Fans Crowd For IND vs ENG 2nd ODI Practice Session : भारतीय संघ आज इंग्लंडविरूद्ध दुसरा वन-डे सामना खेळणार आहे. पहिला समना जिंकून मालिकेत आघडी घेतल्यानंतर दुसरा सामना जिंकून मालिका खिशात घालण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न आहे. त्याचबरोबर आगामी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या सरावाच्या दृष्टीने देखील ही मालिका महत्त्वाची समजली जात आहे. दुसरा सामना ओडिसामधील कटक येथे खेळवण्यात येणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघाने काल ८ फेब्रुवारीसाठी कसून सराव केला आणि भारतीय संघाचा सराव पाहाण्यासाठी ओडियासामधील क्रिकेट चाहत्यांनी बाराबती स्टेडियमवर प्रचंड गर्दी केली.
खेळाडूंची एक झलक पाहाण्यासाठी चाहत्यांनी हजारोंच्या संखेने बाराबती स्टेडियममध्ये उपस्थिती दाखवली. मैदानाबाहेर चाहत्यांच्या लांबच लाबं रांगा व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर स्टॅंड्स चाहंत्यांनी संपूर्ण भरलेले दिसत आहेत.