
India vs England 2nd T20I Playing XI changes explained: सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली ट्वेंटी-२० सामन्यातील विजयी घोडदौड कायम राखण्यासाठी टीम इंडिया चेन्नईत दाखल झाली आहे. कोलकाता येथे झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या ट्वेंटी-२० सामन्यात भारताने सहज विजय मिळवून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. वन डे वर्ल्ड कप स्पर्धेनंतर मोहम्मद शमीला ( Mohammed Shami) निळ्या जर्सीत खेळताना पाहण्यासाठी सारेच उत्सुक होते. पण, कोलकाताच्या घरच्या मैदानावर शमीला संधी दिली गेली नाही आणि चेन्नईत होणाऱ्या दुसऱ्या ट्वेंटी-२०तही त्याला संधी मिळणे अवघड आहे. त्यामुळेच शमी अजूनही पुर्णपणे तंदुरुस्त झाला नाही का, असा प्रश्न विचारला जात आहे.