IND vs ENG 2nd T20I: तो परतला, आता काय खरं नाय... इंग्लंडच्या Playing XI मध्ये २ बदल; भारताला टक्कर देण्यासाठी तगडा संघ जाहीर

England playing XI for 2nd T20I vs India: भारताविरुद्धच्या दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यासाठी इंग्लंडने आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन महत्त्वाचे बदल केले आहेत. मँचेस्टरच्या एमिरेट्स ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर होणाऱ्या या लढतीसाठी साकिब महमूद आणि ल्यूक वूड यांना संघाबाहेर ठेवण्यात आले आहे.
England playing XI for 2nd T20I vs India

England playing XI for 2nd T20I vs India

esakal

Updated on

England team changes for Manchester T20I: भारत-इंग्लंड पहिला ट्वेंटी-२० सामना पावसामुळे रद्द करावा लागल्यानंतर दोन्ही संघ आज पुन्हा एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. भारतीय संघ नुकताच आयर्लंडविरुद्ध दोन सामन्यांची मालिका २-० अशी गमावून आला आहे आणि २०२१ नंतर ते सलग तीन ट्वेंटी-२० सामने हरलेले नाही. ही परंपरा त्यांना कायम राखण्यासाठी इंग्लंडविरुद्ध जिंकावे लागेल, परंतु यजमानांनी तगडी प्लेइंग इलेव्हन जाहीर केली आहे. इंग्लंडने त्यांच्या अंतिम ११ मध्ये दोन बदल केले आहेत आणि साकिब महमूद व ल्यूक वूड यांना बाहेर बसवले आहे. त्यांच्याजागी संघात जोफ्रा आर्चर ( jofra archer) चे पुनरागमन झाले आहे, तर जॉश टंग पदार्पणासाठी सज्ज झाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com