India vs England 2nd Test Live Updates in Marathi Cricket News : भारतीय संघ तीन बदलांसह दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा सामना करणार आहे. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स याने एडबस्टन कसोटीत टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. भारताला आतापर्यंत या मैदानावर एकही कसोटी जिंकता आलेली नाही आणि मालिकेत ०-१ अशा पिछाडीवर पडलेल्या शुभमन गिलला मुसंडी मारून नवा इतिहास रचण्याची संधी आहे. पण, हा सामना सुरू होण्यापूर्वीच ड्रामा पाहायला मिळाला.