Was Akash Deep’s ball to Joe Root a no-ball or legal delivery? : भारतीय संघाने दुसरी कसोटी जिंकून इतिहास रचला आणि इंग्लंडविरुद्धची मालिका १-१ अशी बरोबरीत आणली. या सामन्यात आकाश दीप चमकला आणि दोन्ही डावांत मिळून त्याने १० विकेट्स घेताना अनेक विक्रम मोडले. पण, या सामन्यात आकाशने घेतलेल्या जो रूटच्या विकेटवरून वाद सुरू झाला आहे. आकाशने दुसऱ्या डावात इंग्लंडचा भरवशाचा फलंदाज रूटचा अप्रतिम चेंडूवर त्रिफळा उडवला. पण, हा चेंडू लीगल म्हणजेच अधिकृत नव्हता असा दावा केला जात आहे आणि त्यावर मेरीलेबोन क्रिकेट क्लब (MCC) ने महत्त्वाचा निर्णय दिला आहे.