IND vs ENG 2nd Test: एका षटकाने इंग्लंडचा आत्मविश्वास वाढला! आपलाच गोलंदाज भारताचा वैरी ठरला; स्मिथपाठोपाठ हॅरी ब्रूकचे शतक

IND vs ENG 2nd Test Day3 Marathi News: भारत विरुद्ध इंग्लंड दुसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी एक षटक भारतीय संघासाठी अत्यंत महागात पडले. प्रसिद्ध कृष्णाने आपल्या एका षटकात २३ धावा दिल्या आणि त्याच क्षणापासून इंग्लंडने जोरदार पुनरागमन केलं.
Harry Brook Score Hundreds
Harry Brook Score Hundredsesakal
Updated on

India vs England 2nd Test Day 3 Live Updates in Marathi Cricket News : जेमी स्मिथ व हॅरी ब्रूक यांच्या शतकांनी इंग्लंडला सामन्यात पुनरागमन करून दिले आहे. ५ बाद ८४ अशी धावसंख्या असताना या दोघांनी संघाला ५ बाद २७३ धावांपर्यंत पोहोचवले. दिवसाच्या दुसऱ्या षटकात इंग्लंडला दोन धक्के बसले होते आणि भारताने सामन्यावर पकड घेतली होती. पण, प्रसिद्ध कृष्णाच्या एका षटकात स्मिथने २३ धावा चोपल्या आणि इंग्लंडचा आत्मविश्वास वाढला. २००६ नंतर सर्वात महागडे ( ५-०-५०-०) स्पेल टाकणाऱ्या भारतीय गोलंदाजाचा नकोसा मान प्रसिद्धने आज पटकावला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com