India vs England 2nd Test Day 3 Live Updates in Marathi Cricket News : इंग्लंडने बर्मिंगहॅम कसोटीत अचंबित करणारे पुनरागमन केले. मोहम्मद सिराज व आकाश दीप यांच्या भेदक माऱ्याने त्यांची अवस्था ५ बाद ८४ अशी झाली होती, परंतु जेमी स्मिथ व हॅरी ब्रूक ही जोडी मैदानावर उभी राहिली. या दोघांनी भारतीय गोलंदाजांना चांगलाच घाम गाळायला लावला आणि ३६८ चेंडूंत ३०३ धावांची विक्रमी भागीदारी केली. तिसऱ्या दिवसाच्या तिसऱ्या सत्रात आकाश दीपने ही जोडी तोडली, परंतु तोपर्यंत इंग्लंडच्या संघाच्या नावावर १४८ वर्षांच्या कसोटी क्रिकेटमध्ये आतापर्यंत कोणालाच न जमलेला पराक्रम केला.