IND vs ENG 2nd Test: २६९, १००* ! शुभमन गिलचे शतक अन् ५४ वर्षांपूर्वीचा विक्रम उद्ध्वस्त; एकाही भारतीयाला नव्हता जमला हा पराक्रम

IND vs ENG 2nd Test Day 4 Marathi News: इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत शुभमन गिलने क्रिकेट इतिहासात नवा विक्रम नोंदवला. बर्मिंगहॅम कसोटीत त्याने दोन डावांमध्ये अनुक्रमे २६९ आणि १०० धावा* करत एकाच कसोटी सामन्यात सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजाचा ५४ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडीत काढला
IND vs ENG 2nd Test:  २६९, १००* ! शुभमन गिलचे शतक अन् ५४ वर्षांपूर्वीचा विक्रम उद्ध्वस्त; एकाही भारतीयाला नव्हता जमला हा पराक्रम
Updated on

India vs England 2nd Test Day 4 Live Updates in Marathi Cricket News : एखाद्या संघाला त्यांच्याच घरी जाऊन कसे चोपायचे, हे शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने दाखवून दिले. पहिल्या डावात ५८७ धावा चोपल्यानंतर भारताने दुसऱ्या डावातही ३०० धावांच्या दिशेने वाटचाल केली आहे. त्यामुळे इंग्लंडच्या डोळ्यासमोर पराभव दिसू लागला आहे. पहिल्या डावातील २६९ धावांनंतर कर्णधार शुभमन गिलने दुसऱ्या डावातही शतक झळकावताना अनेक विक्रम नावावर केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com