India vs England 2nd Test Day 4 Live Updates in Marathi Cricket News : रोहित शर्मा, विराट कोहली यांचा वसा चालवण्याची आपल्यात धमक आहे, हे शुभमन गिलने दाखवून दिले. दोन दिग्गजांच्या अचानक निवृत्तीमुळे शुभमनकडे कसोटी संघाचे नेतृत्व आले, त्यात विराटच्या चौथ्या क्रमांकाची जबाबदारीही आली. या दोन्ही आघाड्यांवर शुभमनने आपली योग्यता सिद्ध करताना इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका गाजवली आहे. पहिल्या डावातील २६९ धावांनंतर भारतीय कर्णधाराने दुसऱ्या डावात शतक झळकावून अनेक विक्रम कवेत घेतले.