
India vs England 2nd Test Live Updates in Marathi Cricket News : शुभमन गिलच्या २६९ धावांच्या खेळीच्या जोरावर टीम इंडियाने दुसऱ्या कसोटीत ५८७ धावांचा डोंगर उभा केला. इंग्लंडवर दडपण प्रकर्षाने जाणवत होते आणि त्याचा फायदा उचलून आकाश दीपने ( Aakash Deep) तिसऱ्याच षटकात इंग्लंडला दोन धक्के दिले. बेन डकेट व ऑली पोप हे भरवशाचे फलंदाज माघारी परतल्याने इंग्लंडवरील दडपण अधिक वाढले. त्यात मोहम्मद सिराजने तिसरा धक्का देताना झॅक क्रॉलीला बाद केले आणि आता भारताला मालिकेत बरोबरी करण्याची संधीच मिळाली आहे.