
India vs England 2nd Test Live Updates in Marathi Cricket News : भारताच्या पहिल्या डावातील ५८७ धावांचा पाठलाग करताना इंग्लंडला १३ धावांवर दोन धक्के बसले आहेत. या सामना गाजवला तो टीम इंडियाचा कर्णधार शुभमन गिल याने... त्याने अनके विक्रमांची नोंद केली, परंतु त्रिशतकाने त्याला हुलकावणी दिली. २६९ धावांवर माघारी जात असताना इंग्लंडच्या खेळाडूंनी गिलचे हात मिळवून कौतुक केले. त्याचवेळी इंग्लंडच्या चाहत्यांनी...
भारतीय संघाने दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात ५८७ धावांचा डोंगर उभा करून यजमान इंग्लंडला दडपणाखाली आणले आहे. लोकेश राहुल ( २) अपयशी ठरला असला तरी यशस्वी जैस्वालने ( ८७) भारतीयांचे मनोबल उंचावणारी खेळी केली. त्याने करुण नायरसह दुसऱ्या विकेटसाठी ९० चेंडूंत ८० धावा जोडल्या. त्यानंतर शुभमन व यशस्वी यांनी १३१ चेंडूंत ६६ धावांची भागीदारी केली. पण, यशस्वीच्या विकेटनंतर भारताच्या धावगतीला ब्रेक लागला होता.
कर्णधार शुभमन गिलने सर्व सूत्र हाती घेताना इंग्लंडच्या गोलंदाजांना बॅकफूटवर फेकले. त्याने सहाव्या विकेटसाठी रवींद्र जडेजासह २७९ चेंडूंत २०३ धावा जोडून सामनाच फिरवला.भारतीय संघ जास्तीतजास्त ३५० धावांपर्यंत पोहोचेल असे वाटत होते, परंतु त्यांनी जवळपास सहाशे धावांपर्यंत मजल मारली. जडेजा १३७ चेंडूंत १० चौकार व १ षटकारासह ८९ धावांवर बाद झाला. त्यानंतर शुभमनचे वर्चस्व पाहायला मिळाले. वॉशिंग्टन सुंदरची ( ४२) त्याला १४४ धावांची साथ मिळाली.
शुभमन ३८६ चेंडूंत ३० चौकार व ३ षटकारांसह २६९ धावांवर बाद झाला. भारताचा पहिला डावा ५८७ धावांवर ऑल आऊट झाला. शोएब बशीरने ३, तर जॉश टंग व ख्रिस वोक्स यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.इंग्लंडविरुद्ध कसोटीत २०२२ नंतर परदेशी संघाची ही सर्वोत्तम धावसंख्या ठरली. २०२२ मध्ये पाकिस्तानने रावळपिंडीत ५७९ धावा केल्या होत्या.
आकाश दीपने इंग्लंडला सलग दोन धक्के दिले आणि इंग्लंडची अवस्था २ बाद १३ धावा अशी झाली. बेन डकेट व ऑली पोप हे दोन्ही प्रमुख खेळाडू माघारी परतले. आकाश दीपची हॅटट्रिक हुकली, परंतु टीम इंडियाने सामन्यावर पकड घेतली आहे. दरम्यान, एडबस्टन कसोटी गाजवणाऱ्या शुभमन गिलचे भारतीयांनीच नव्हे, तर इंग्लंडच्या चाहत्यांनीही कौतुक केले. गिल बाद होऊन माघारी जात असताना इंग्लंडच्या चाहत्यांनी जागेवर उभं राहून टाळ्यांचा कडकडाट केला. हेच प्रेक्षक भारतीय खेळाडूंना ट्रोल करताना दिसत होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.