Ravi Shastri lashes out at Team India’s decision : भारतीय संघाने बर्मिंगहॅम कसोटीत जसप्रीत बुमराहला विश्रांती देण्याचा निर्णय घेतला. भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी या निर्णयावर जोरदार टीका केली आहे. लीड्समध्ये भारतीय संघाला पराभव पत्करावा लागला होता आणि त्यामुळे जसप्रीतचे दुसऱ्या कसोटीत असणे महत्त्वाचे होते. पण, संघ व्यवस्थापन, मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर व कर्णधार शुभमन गिल यांनी वर्क लोडचे नियोजन करण्यासाठी जसप्रीतला विश्रांती दिली. यावरून शास्त्रींनी चांगलीच कानउघडणी केली.