India vs England 2nd Test Live Updates in Marathi Cricket News : मोहम्मद सिराजने ( Mohammed Siraj ) एडबॅस्टन कसोटीच्या तिसऱ्या दिवसाच्या दुसऱ्याच षटकात इंग्लंडला सलग चेंडूंवर दोन धक्के दिले. काल आकाश दीपने सलग दोन विकेट्स घेऊन इंग्लंडला बॅकफूटवर फेकले होते आणि आज सिराजने दुसऱ्या षटकात जो रूट व बेन स्टोक्स या मुख्य फलंदाजांना माघारी पाठवले. भारतीय संघाने सामन्यावरील पकड आणखी मजबूत करताना इंग्लंडचा निम्मा संघ ८५ धावांवर तंबूत पाठवला आहे.