England vs India, 3rd Test at Lord's, London: भारत आणि इंग्लंड यांच्यातली तिसरी कसोटी खरंच रोमांचक वळणावर आली आहे. नितीश कुमार रेड्डी बाद झाला तेव्हा भारताला विजयासाठी ८१ धावा हव्या होत्या आणि हाताशी फक्त २ विकेट्स होत्या. त्यामुळे भारताचा डाव लंच ब्रेकपर्यंत गुंडाळून इंग्लंड विजयी पताका रोवेल असे वाटले होते. मात्र, रवींद्र जडेजा ( Ravindra Jadeja) व जसप्रीत बुमराह ही जोडी मैदानावर उभी राहिली. जड्डूने अर्धशतक झळकावून विक्रमाला गवसणी घातली.