England vs India, 3rd Test at Lord's, London: यजमान इंग्लंडला सामना हातात आला असे वाटत असले तरी त्यांच्या मार्गात रवींद्र जडेजा, हा भारताचा सर्वात अनुभवी अष्टपैलू खेळाडू उभा आहे. त्याला बाद करण्यासाठीचे प्रयत्न अपयशी ठरलेले असताना इंग्लंडकडून नितीश कुमार रेड्डीला टोमणे मारण्याचा डाव खेळलेला दिसला. त्यात ब्रेडन कार्स व जड्डू यांच्यात बाचाबाची झालेली पाहायला मिळाली. जड्डू धाव घेत असताना कार्ससोबत त्याची टक्कर झाली आणि त्यावरून शाब्दिक चकमक झाली.