Gautam Gambhir reacts to We Want Sanju chants
esakal
Gautam Gambhir reaction to Sanju chants: संजू सॅमसनला खराब फॉर्मामुळे संघाबाहेर करण्याचा निर्णय टीम इंडियासाठी काही फलदायी ठरलेला नाही. १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीला पदार्पणाची संधी दिली गेली, परंतु त्याला दोन सामन्यांत अनुक्रमे १४ व १३ धावा करता आल्या. त्यामुळे पुन्हा संजूला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवण्याची मागणी होतेय. कालच्या लाजीरवाण्या पराभवानंतर तर चाहत्यांनी 'We Want Sanju' अशी नारेबाजी दिली. सामन्यानंतर टीम बसकडे जात असताना गौतम गंभीर व तिलक वर्मा यांच्यासमोर चाहत्यांनी संजूला खेळवण्यासाठी ही नारेबाजी केली आणि तेव्हा मुख्य प्रशिक्षकाचा चेहरा पाहण्यसारखा झाला होता.