LORD'S GIVING STANDING OVATION TO Ravindra JADEJA : भारतीय संघाला लॉर्ड्स कसोटीत पराभव पत्करावा लागला. रवींद्र जडेजाने शेवटपर्यंत मैदानावर उभं राहताना भारताच्या विजायच्या आशा कायम ठेवल्या होत्या. ८१ वरून त्याने धावांचे अंतर २२ पर्यंत आणलेही होते, परंतु मोहम्मद सिराज दुर्दैविरित्या बाद झाला अन् भारताचा खेळ संपला. भारताला २२ धावांनी पराभव पत्करावा लागला आणि इंग्लंडने मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली.