England vs India, 3rd Test at Lord's, London: लॉर्ड्स कसोटी रोमांचक वळणावर आहे. पहिल्या डावात भारताला बरोबरीत रोखल्यानंतर इंग्लंडला मोठे आव्हान देता आले असते. पण, वॉशिंग्टन सुंदरने मॅच फिरवली. त्याने ४ विकेट्स घेतलाना इंग्लंडला १९२ धावांवर गुंडाळले. आता भारत सहज ही मॅच खिशात घालतेय असे वाटत असताना ५८ धावांवर चार विकेट्स पडल्या आहेत. त्यामुळे पाचव्या दिवसाचा रोमांच पाहण्यासाठी प्रेक्षक मोठ्या संख्येने लॉर्ड्सवर उपस्थित आहेत.