England vs India, 3rd Test at Lord's, London: भारत-इंग्लंड तिसऱ्या कसोटीचा दुसरा दिवस जसप्रीत बुमराहने ( Jasprit Bumrah) गाजवला. पहिल्या सत्रातील त्याच्या सुरुवातीच्या तीन षटकांत त्याने इंग्लंडला तीन धक्के दिले. बेन स्टोक्स व जो रूट या सेट झालेल्या फलंदाजांचा त्रिफळा उडवल्यानंतर त्याने ख्रिस वोक्सला भोपळ्यावर माघारी पाठवले. मोहम्मद सिराजलाही एक विकेट मिळाली असती, परंतु लोकेश राहुलने स्लीपमध्ये जेमी स्मिथचा सोपा झेल टाकला. त्यात लॉर्ड्सवर आणखी एक ड्रामा पाहायला मिळाला.