England vs India, 3rd Test at Lord's, London: इंग्लंडच्या ३८७ धावांच्या प्रत्युत्तरात भारतालाही ३८७ धावा करता आल्या. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पहिल्या दोन डावांत बरोबरी होण्याची ही नववी वेळ आहे. यानंतर इंग्लंडचे सलामीवीर झॅक क्रॉली व बेन डकेट फलंदाजीला आले आणि दिवसअखेर त्यांनी दोन धावांची आघाडी घेतली. दरम्यान, जसप्रीत बुमराहच्या षटकात वातावरण पेटलेले दिसले. कर्णधार शुभमन गिल अचानक आक्रमक झाला आणि त्याने क्रॉली व डकेट यांच्यासोबत वाद घातला. सध्या हा Video Viral झाला आहे.