Irfan Pathan predicted playing XIs for India Vs England Lord's Test : शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील युवा टीम इंडिया इंग्लंडमध्ये ऐतिहासिक विजय मिळवेल, असा विचारही यजमानांनी केला नव्हता. पण, लीड्स कसोटीच्या पराभवानंतर टीम इंडियाने जोरदार प्रत्युत्तर दिले आणि एडबॅस्टन कसोटीत मोठ्या फरकाने विजय मिळवून मालिका १-१ अशी बरोबरीत आणली. लॉर्ड्सवर उद्यापासून तिसरा कसोटी सामना होणार आहे आणि त्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन्ही संघ कोणते बदल करतायेत, याची उत्सुकता आहे. दुसऱ्या कसोटीत जसप्रीत बुमराहला विश्रांती दिली गेली होती आणि तो लॉर्ड्स कसोटीसाठी परतणार आहे. पण, त्याच्यासाठी संघातून बाहेर कोण बसेल?