Jasprit Bumrah’s 5-wicket haul in IND vs ENG 3rd Test at Lord’s
जसप्रीत बुमराहने पाच विकेट्स घेत इंग्लंडला पूर्णपणे बॅकफूटवर फेकले. जो रूटच्या शतकी खेळीने इंग्लिश चाहत्यांना आनंदीत केले खरे, परंतु जसप्रीतच्या स्पेलने त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हिरावून घेतला. भारताने कालच्या ४ बाद २५१ धावांवरून इंग्लंडचा पहिला डाव दुसऱ्या दिवशी ३८७ धावांवर गुंडाळला. जसप्रीतने आजच्या कामगिरीनंतर कपिल देव, वसीम अक्रम यांच्यासह अनेक दिग्गजांचे विक्रम मोडले.