England vs India, 3rd Test at Lord's, London: इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत जसप्रीत बुमराहने क्लासिक गोलंदाजीचं उत्तम प्रदर्शन केलं. पहिल्यांदा बेन स्टोक्सला चकवण्यासाठी त्याने एक चेंडू मुद्दाम चौकार मारू दिला. फलंदाजाला आत्मविश्वासात आणलं आणि लगेचच पुढच्या चेंडूवर इनस्विंगर टाकत स्टम्प्स उडवले. बुमराह इथंच थांबला नाही. त्याच्या पुढच्या ओव्हरमध्ये इंग्लंडचा सर्वात विश्वासार्ह फलंदाज जो रूटलाही चकवत क्लीन बोल्ड केलं. रूटही चेंडूच्या स्विंगला फसून जात स्टम्प्सच्या मागे पाहत राहिला. त्यानंतर पुढच्याच चेंडूवर त्याने ख्रिस वोक्सला बाद करून हॅटट्रिकची संधी निर्माण केली, परंतु ती हुकली.