England vs India, 3rd Test at Lord's, London: जो रूटने पहिल्या दिवशी नाबाद ९९ धावा केल्या आहेत आणि इंग्लंडला तिसऱ्या कसोटीत सावरले आहे. ऑली पोप आणि कर्णधार बेन स्टोक्स यांची त्याला साथ मिळाल्याने भारताचे सामन्यावर पकड घेण्याचे स्वप्न दूरावले. नितीश कुमार रेड्डीने त्याच्या पहिल्याच षटकात दोन विकेट्स घेऊन भारतीयांसाठी आशादायी चित्र तयार केले होते, परंतु त्याला इतरांकडून अपेक्षित साथ मिळाली नाही.