England vs India, 3rd Test at Lord's, London: नितीश कुमार रेड्डीच्या धक्क्यानंतर इंग्लंडचा डाव सावरलेला दिसतोय. भारत-इंग्लंड तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या सत्रात यजमान बॅकफूटवर होते, परंतु जो रूट ( Joe Root) व ऑली पोप यांनी तिसऱ्या विकेटसाठी पन्नासहून अधिक धावांची भागीदारी करताना इंग्लंडची गाडी रुळावर आणली आहे. दरम्यान, जो रूटने ऐतिहासिक भरारी घेतली आहे. या कामगिरीपूर्वी मोहम्मद सिराजने( Siraj-Root Verbal Clash) रूटला डिवचण्याचा प्रयत्न केला होता.