
Jofra Archer returns to Test cricket after four years for Lord’s Test
भारताकडून लाजीरवाणा पराभव पत्करल्यानंतर इंग्लंडच्या ताफ्यात घबराट पसरली आहे. शुभमन गिलच्या युवा संघाकडून अशा प्रत्युत्तराची अपेक्षा त्यांनीही केली नव्हती, परंतु टीम इंडियाने कमाल केली. दुसऱ्या कसोटीत ३३६ धावांनी दणदणीत विजय मिळवून मालिका १-१ अशी बरोबरीत आणली. इंग्लंडचा संघ पुनरागमनासाठी आतुर आहे आणि त्यामुळे त्यांनी तिसऱ्या कसोटीसाठी प्लेइंग इलेव्हन जाहीर केला आहे. इंग्लंडने लॉर्ड्स कसोटीसाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये हुकमी एक्का बोलावला आहे.