England vs India, 3rd Test at Lord's, London: रोमांचक वळणावर असलेल्या भारतीय संघाला लॉर्ड्स कसोटीच्या पाचव्या दिवसाच्या पहिल्या ४० मिनिटांत दोन मोठे धक्के बसले. जोफ्रा आर्चरने दिवसाच्या चौथ्या षटकात रिषभ पंतचा दांडा उडवला, त्यानंतर कर्णधार बेन स्टोक्सने KL Rahul ला पायचीत पकडले. पंत ९, तर लोकेश ५८ चेंडूंत ३९ धावांवर माघारी परतला आणि भारताला ८२ धावांवर सहावा धक्का बसला. त्यात वॉशिंग्टनच्या विकेटची भर पडली आणि जोफ्रा आर्चरने अफलातून झेल टिपला.